सर्वोच्च न्यायाल्याचा आज ऐतिहासिक दिवस; पहिल्यांदाच मावळत्या सरन्यायाधीशांचा निरोप समारंभ थेट बघता येणार

नवी दिल्ली, २६ ऑगस्ट २०२२: भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या आज शेवटच्या दिवसाच्या कामकाजाचे सर्वोच्च न्यायालयाकडून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य जनता आज सर्वोच्च न्यायालयातील कार्यवाही लाईव्ह पाहू शकतील.

२०१८ च्या निकालानंतर पहिल्यांदाच थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. फ्रीबी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर होणाऱ्या सुनावणीचे आज थेट प्रक्षेपण होणार आहे. सर न्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली सेरेमोनिअल बेंचसमोर खटले होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार वीस केसेसचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. सर न्यायाधीश यांचा आज कार्यकाळाचा शेवटचा दिवस असल्यामुळे न्यायाल्याकडून त्यांना विषेश पध्दतीने निरोप देण्यात येणार आहे. आज सकाळी १०.३० वाजल्यापासून सर न्यायाधीशांच्या न्यायालयाची सुनावणी सूरु होणार आहे. NIC या वेबकास्ट पोर्टल द्वारे थेट प्रक्षेपित केली जाईल. असे सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा