‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश

दिल्ली, ३ मे २०२३: ‘द केरळा स्टोरी’ चित्रपटाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, प्रत्येक प्रकरणावर उपाय म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे जाता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. मुख्य न्यायमूर्तींनी हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवले आहे.

हा चित्रपट ५ मे रोजी म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यास सांगितले. चित्रपटानुसार, त्या मुलींची कथा आहे की, ज्यांना नर्स व्हायचं होतं… पण त्या आयएसआयएस च्या दहशतवादी बनल्या. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरमध्ये ब्रेन वॉश, लव्ह जिहाद, हिजाब आणि आयएसआयएस सारखे शब्द वापरण्यात आले आहेत.

केरळमधील ३२,००० बेपत्ता मुलींची ही कथा आहे, ज्यांचे प्रथम ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले आणि नंतर त्यांना आयएसआयएस चे दहशतवादी बनवले गेले, असा या चित्रपटाचा दावा आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा