गोल पोस्ट इतर सुरत : गुजरातमध्ये कार शोरुमला भीषण आग; आग आटोक्यात

सुरत : गुजरातमध्ये कार शोरुमला भीषण आग; आग आटोक्यात

सुरत, २७ जानेवारी २०२३ :गुजरातमध्ये गुरुवारी रात्री एका कार शोरुमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण होती आकाशात उंचच उंच आगीचे व धुराचे प्रचंड लोट उसळले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधल्या उधना भागामध्ये ही घटना घडली आहे. एका कार शोरुमला अचानक आग लागली. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

आगीचा हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version