कोलकाता २२ जानेवारी २०२५ : भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या १६ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. नुकतीच टीम इंडियाच्या संघाची घोषणा कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी केली. टीमची घोषणा झाल्यानंतर काही सदस्यांनी टीका केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर येत आहेत. टीम इंडियाच्या अनुभवी आणि स्टार फलंदाज आणि गोलंदाजांना संघात स्थान मिळालेलं नाही. यामध्ये प्रामुख्याने सूर्यकुमार यादवच नाव चर्चेत येत आहे.
भारत आणि इंग्लंड टी- २० मालिकेच्या पहिल्या सामन्याआधी कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “संघात निवड न झाल्याने कोणी नाराज का होईल ? मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असती तर माझी संघात नक्कीच निवड झाली असती.” असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केलं आहे.
पुढे तो म्हणाला की, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेला संघ पहाता संघातील प्रत्येक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांची आतापर्यंतची कामगिरी शानदार राहिलेली आहे. मागच्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमारची कामगिरी खराब राहिली असली तरी आजच्या सामन्यात कर्णधार सुरकुमार यादव काय रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर