Mumbai MI vs KKR SuryaKumar Yadav new record: वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियायन्सने गतविजेत्या कोलकताला हरवत आपल्या पहिल्या विजयची नोंद केली. मुंबईने कोलकता नाईट रायडर्सला ८ विकेट्सने पराभूत केलं. या सामन्यात मुंबईकडून २३ वर्षीय युवा गोलंदाज अश्वनी कुमार हीरो ठरला. याचबरोबर कालच्या सामन्यात विजयी षटकार लावत सूर्यकुमारने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा मान कोलकाताच्या संघला दिला होता.प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकता नाइट रायडर्सने २० षटकांत अवघ्या ११६ धावा केल्या. २३ वर्षीय अश्वनी कुमारने कोलकता संघाच्या ठिल्या उडवल्या त्यानं ३ षटकांत ४ विककेट्स घेतल्या. ११६ धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून रायन रिकेल्टन शानदार अर्धशतक झळकावल.
त्याने सलामीवीर रोहित शर्मा आणि विल जॅक्ससोबत दमदार भागीदारी केली. रोहित आणि विल जॅक्सची विकेट्स गेल्यावर त्याला साथ देण्यासाठी सूर्यकुमार यादव आला.ज्यावेळी सूर्यकुमार यादव फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा त्यानं आक्रमक भूमिकेत खेळायला सुरुवात केली. सूर्याने ९ चेंडूत ३ आणि २ षटकार ठोकत नाबाद २७ धावांची खेळी केली.
सूर्याने रचला नवा विक्रम :
सूर्यकुमार यादवने कालच्या सामन्यात विजयी षटकार ठोकत टी-२० क्रिकेटमध्ये ८००० धावांचा टप्पा पार केला आहे. टी- २० क्रिकेटमध्ये ८ हजार धावा करणारा तो जगातील ३५ वा तर भरताचा ५ वा खेळाडू ठरला आहे.त्याने आजवर ३१२ टी-२० सामन्यातील २८८ डाव खेळताना ८००७ धावा केल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर