सूस रस्त्यावरील ओल्या कचऱ्यापासून सीएनजी बनवणाऱ्या प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह तिघांना अवमान नोटीस बजावली आहे. २०० टन क्षमतेच्या या प्रकल्पाच्या खासगी संचालकाने सर्वोच्च न्यायालयाच्या मागील निर्देशांचे आणि पर्यावरण संरक्षण कायद्याचे स्पष्ट उल्लंघन केले, असा आरोप सूस रोड बाणेर विकास मंचने केला आहे.
रहिवाशांच्या हिताकडे दुर्लक्ष करून, महापालिकेने या समस्येवर कारवाई केली नाही. तसेच, ‘नीरी’ संस्थेमार्फत दर सहा महिन्यांनी होणारे पर्यावरणीय ऑडिटही झाले नाही, असे याचिकाकर्त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले













































