सुशांत प्रकरण : मुंबई पोलिस सक्षम, सीबीआय चौकशीला विरोध नाही- पवार

मुंबई, १२ ऑगस्ट २०२०: अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी ५० वर्षांपासून मुंबई पोलिसांना ओळखतो. जे काही घडत आहे आणि जे काही चर्चेत आहे ते योग्य नाही. कोणी एकाने आत्महत्या केली आहे ही वाईट घटना आहे. परंतु, शेतकरी आत्महत्या करतात त्याविषयी कोणीही चर्चा करत नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “या सर्व गोष्टींनंतरही जर कोणी सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही.” उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवर शरद पवार म्हणाले की “ते अपरिपक्व आहेत, त्यांच्या विधानावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. ”

मजीद मेमन यांनीही प्रश्न उपस्थित केले

शरद पवारांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनीही सुशांत प्रकरणात माध्यमांद्वारे उपस्थित होत असलेल्या या प्रश्नावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मजीद मेमन म्हणाले की, सुशांत सिंग राजपूत हे हयात असताना जेवढे प्रसिद्ध नव्हते तेवढे माध्यमांनी त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर खुपच प्रसिद्धी मिळवून दिली आहे

मजीद मेमन म्हणाले की, आता पंतप्रधान आणि अमेरिकेचे अध्यक्ष यांच्यापेक्षा अधिक मीडिया सुशांतला जागा देत आहे. जेव्हा एखादा गुन्हा अन्वेषण विभागाच्या टप्प्यात असतो तेव्हा गोपनीयता राखली जावी. महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक गोष्टी सार्वजनिक केल्याने सत्य आणि न्यायाच्या हितावर प्रतिकूल परिणाम होतो.

पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची केली मागणी

नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूची योग्य चौकशी व्हायला हवी, अशी भूमिका पार्थ पवार यांनी व्यक्त केली, ही संपूर्ण देशाची, विशेषत: तरूणांची भावना आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा