गोल पोस्ट महाराष्ट्र सुशांतने आठवडेभरापूर्वीच दिले होते आत्महत्येचे संकेत

सुशांतने आठवडेभरापूर्वीच दिले होते आत्महत्येचे संकेत

मुंबई, दि.१४ जून २०२०: हिंदी चित्रपटसृष्टीच्या शिखरावर असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केलेली आत्महत्या सर्वांना चटका लावून जाणारी आहे. मात्र, त्याने आत्महत्या का केली याची अनेक कारणे समोर येत आहेत. मात्र, त्याने आत्महत्या करण्याचे संकेत आठवड्याभरा पूर्वीच दिले असल्याचे त्याच्या ट्विटरच्या कव्हर पेज फोटो वरून सिद्ध होत असल्याचे समोर येत आहे.

सुशांतच्या ट्विटर अकाउंटच्या कव्हर पेज असणारा फोटो म्हणजे ” द स्टारी नाईट ” ही व्हिन्सेंट व्हॅन गोघ यांनी बनवलेली पेंटिंग आहे.

हा जग प्रसिद्ध चित्रकार सुद्धा मानसिक तणावाने त्रस्त होता. अखेर मानसिक तणाव सहन न झाल्याने त्याने २७ जुलै १९८० मध्ये वयाच्या ३७ व्या वर्षी पेंटिंग काढतांना त्याने बंदुकीतून स्वतःच्या छातीवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. दोघांच्या आयुष्यात सारखेपणा दिसत असल्याच्या चर्चा आता होऊ लागल्या आहेत.

कदाचित त्याच्या ट्विटर आकाउंटला असलेला तो फोटो आजच्या आत्महत्येचा संकेत देणारा तर नसेल…?

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

error: Content is protected !!
Exit mobile version