पुणे १३ जुलै २०२२: सुंशांत सिंग राजपूत प्रकरण आजून पूर्णपणे संपलेले नसताना आता त्यात नवीन वळण पुढे आले आहे. ज्यात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ कौशिक चक्रवर्ती याने सुशांतला ड्रग्ज घेण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केले आहेत. त्यामुळे अर्थातच रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात एनसीबीने नवीन आरोपपत्र सादर करुन ३५ आरोपींची नावे यात समाविष्ट केली आहे. ज्यानुसार हे सर्व आरोपी २०१८ पासून सुशांतला ड्रग्ज पुरवत होते. एवढचं नाही, तर सुशांतला ड्रग्जचे व्यसन लावण्यात रियाचा सहभाग असल्याचं या आरोपपत्रात नमूद केलं आहे. त्याचबरोबर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी यानेदेखील सुशांतच्या ड्रग्जसाठी अकाऊंटमधून पैसे काढल्याचे या आरोपपत्रात दाखल केले आहे. बॅंकेच्या या व्यवहारासाठी पूजा सामग्री असा शब्दप्रयोग केला गेल्याचं यात नमूद केलं आहे.
एनसीबीनं सादर केलेल्या आरोपपत्रात असंही म्हटलं आहे की, सुशांतनं आत्महत्या करण्याआधीपासून दोन वर्ष ड्रग्ज मिळत होते. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणी आणि अन्य आरोपीं ड्रग्ज खरेदी करायचे. त्या सर्वांनी मिळूनच सुशांतला ड्रग्जची सवय लावली. त्यामध्ये रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतकडे काम करणारे दोन कर्मचारी यांचा समावेश होता. या सर्वांमार्फत सुशांतला ड्रग्ज दिलं जात होतं. एनसीबीच्या आरोपपत्रानुसार हे सर्व आरोपी हाय सोसायटी आणि बॉलिवूडमध्ये ड्रग्ज खरेदी विक्रीचे व्यवहार, ड्रिस्ट्रीब्युटर अशा कामांमध्ये सहभागी होते.
या आरोप पत्रामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता असून रियाला पुन्हा एकदा कोर्टात सादर व्हावे लागेल. त्यातून कोणत्या गोष्टी समोर येतील आणि प्रकरण काय वळण घेईल? हे काळचं ठरवेल.
न्यूज अनकट प्रतिनिेधी- तृप्ती पारसनीस