जळगाव, १८ जून २०२३: जुन्या वादातून एका २३ वर्षीय तरुणांची हत्या केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपीला अटक केली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात आकाश शांताराम शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या लहान भाऊ मंगळ शांताराम शेळके यांच्यासोबत पूर्वी झालेल्या वाद उकरून काढत संशयित राहुल तुकाराम पाडळे यांनी मंगलची कॉलर पकडून शिवीगाळ केली.
तसेच त्यांच्याशी झटापट करत असताना त्यांना चालत्या दुचाकीवर जबरदस्तीने बसवत जोराने नेले आणि पुढे जाऊन ढकलून दिल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिसांनी संशयित आरोपी राहुल तुकाराम पाडळे यास अटक केली आहे. आरोपीस कोर्टात हजर केले असता २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सतीश कुलकर्णी करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर