पुणे विद्यापीठाची पदवीधर निवडणुक प्रक्रिया स्थगित करा, मराठा महासंघाची मागणी

4

पुणे, ५ नोव्हेंबर २०२२ : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर महासंघानं आक्षेप घेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविराज काळे यांनी निवडणूक अधिकारी प्रफुल्ल पवार यांना निवडणूक प्रक्रिये विरोधात निवेदन दिले आहे.

यामध्ये नमूद करण्यात आलंय की, आपण विद्यापिठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांची निवडणूक प्रक्रिया सुरू करताना, अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणं गरजेचं होते. परंतु आपण अशी कोणतीही पत्रकार परिषद न घेता तसेच नवीन पदवीधर मतदारांना आणि निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांना अंधारात ठेवून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच आपण निवडणूक कार्यक्रमाचं परिपत्रक जारी केलंय. परंतु संकेतस्थळावर रोज किती मतदार भेट देत असतील याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आपण कोणतीही पत्रकार परिषद न घेताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळं पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. नवीन पदवीधर मतदारांपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मतदारांपर्यंत पोहोचली आहे का याविषयी साशंकता आहे.

त्यामुळं नवीन पदवीधरांना पदवीधर मतदार म्हणून नोंदणीसाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी,
पुणे पदवीधर मतदार संघातील पुणे जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या मतदारांना या अधिसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जाहीर केलेल्या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देऊन निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्यात यावी.अशी मराठा महासंघाकडून करण्यात आलीय.

मराठा महासंघाच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार न केल्यास २० नोव्हेंबरला विविध मतदान केंद्रांवर मराठा महासंघाकडून तीव्र स्वरूपाची आंदोलनं करण्यात येतील असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविराज काळे यांनी दिलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा