नवी दिल्ली, १८ ऑगस्ट,२०२३ : विरोधी पक्षातील काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांना पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर १० ऑगस्ट रोजी लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. या समितीची बैठक आज पार पडली. समितीने अधीर रंजन यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली आहे.
समितीचा संपूर्ण अहवाल येईपर्यंत त्यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान आज लोकसभेच्या या विशेषाधिकार समितीची आज बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी समितीसमोर हजर राहण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात घेतला आहे.
त्यांना ३० ऑगस्ट रोजी समितीसमोर हजर राहण्यास सांगितले जाऊ शकते. अधीररंजन यांनी सभागृहाच्या आणि सभापतींच्या अधिकारांची अवहेलना केली आहे. सभागृहाने त्यांना जाणूनबुजून आणि वारंवार केलेल्या गैरवर्तणूकीचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठविण्यात आले. समिती चौकशी करून अहवाल येईपर्यंत अधीर रंजन चौधरी सभागृहातून निलंबित राहतील. असे सांगण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर