राहुलच्या खेळण्यावर सस्पेन्स, असा असू शकतो भारत-बांगलादेश प्लेइंग-११

india vs bangladesh 2nd test:, २२ डिसेंबर २०२२: भारतीय संघाला बांगलादेश दौऱ्यावर मालिकेतील दुसरा म्हणजेच शेवटचा कसोटी सामना खेळायचा आहे. हा सामना आज (२२ डिसेंबर) मीरपूर येथे भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून खेळवला जाईल. भारतीय संघानं मालिकेतील पहिला सामना १८८ धावांनी जिंकला होता. यासह टीम इंडियानं मालिकेत १-० अशी आघाडी कायम ठेवलीय.

दुखापतग्रस्त राहुलच्या खेळण्याची शक्यता कमी

जखमी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल या मालिकेत कर्णधार आहे. पण नेट प्रॅक्टिस दरम्यान राहुलला दुखापत झाल्याचीही एक वाईट बातमी आहे. त्याच्या हाताला दुखापत झालीय. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दुखापत गंभीर नसल्याचं सांगितलं असलं तरी या सामन्यात राहुल खेळेल अशी अपेक्षा आहे.

राहुल खेळला तर ठीक आहे. अन्यथा त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी दिली जाऊ शकते. २७ वर्षीय अभिमन्यूला संधी मिळाली, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण सामना असंल. राहुलच्या अनुपस्थितीत चेतेश्वर पुजारा कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. याशिवाय भारतीय संघाच्या प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

बांगलादेश संघात होऊ शकतो हा बदल

बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसन यानं दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करू शकणार असल्याचे स्पष्ट केलंय. अशा स्थितीत या संघात मोठे बदल होण्याची आशा नाही. पाठीच्या दुखापतीने त्रस्त वेगवान गोलंदाज इबादत हुसेनच्या जागी तस्किन अहमदला संधी दिली जाऊ शकते.

भारत-बांगलादेश संभाव्य प्लेइंग-११

भारतीय संघ: शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार) / अभिमन्यू इसवरन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश संघ: नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, यासिर अली, लिटन दास, शकीब अल हसन (क), मुशफिकुर रहीम, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद आणि खालिद अहमद.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा