मुंबई, १२ मे २०२३: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. राज्यातील शिंदे-फडणसीस सरकारने याबाबतचे आदेश आज काढले आहेत. त्यामुळे परमबीरसिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा खळबळ जनक गौप्यस्फोट परमबीर सिंह यांनी केला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. तर या आरोपांमुळे तत्काळीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना अटकही झाली होती. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. त्यामुळे परमबीरसिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर