प्रजासत्ताकदिनी कटाचा संशय; दिल्लीत दोन खलिस्तानी दहशतवादी पकडले

दिल्ली, २१ जानेवारी २०२३ : प्रजासत्ताकदिनापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पुन्हा एकदा दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांपैकी राजन भाटी हा पंजाबमधील कुख्यात ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठादार आहे. तर दुसरा चिन्ना असून त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत. पोलिस या दोन दहशतवाद्यांची चौकशी करीत आहेत. हे दोन्ही दहशतवादी काही मोठा कट रचण्यासाठी दिल्लीत आले असल्याचा पोलिसांना संशय आहे.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही दहशतवाद्यांबद्दल भक्कम माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांना पंजाबमधून अटक करण्यात आली. या दोन्ही दहशतवाद्यांना प्रजासत्ताकदिनापूर्वी कॅनडामध्ये बसलेल्या लखबीर सिंग लांडा या दहशतवाद्याकडून काही मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे दिल्लीतील एखाद्या घटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. अटकेनंतर पोलिसांनी या दोन दहशतवाद्यांची ओळख पटवली असून, राजन भाटी गुरुदासपूरचे रहिवासी, तर
कंवलजीत सिंग उर्फ ​​चिन्ना फिरोजपूरचा रहिवासी असल्याचे आढळून आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे उपायुक्त मनीष चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही खलिस्तानी दहशतवादी आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. दिल्लीत सुरू झालेल्या दहशतवादी गँगस्टर नेक्ससविरोधातील मोहिमेअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी राजन भाटी हा पंजाबमधील कुख्यात ड्रग्ज तस्कर आहे; तसेच अनेकवेळा मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची तस्करीही केली आहे. पंजाब पोलिसांच्या हायप्रोफाईल गुंडांमध्ये त्याचे नाव सामील आहे. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा दहशतवादी सध्या पंजाबमधील फरारी गुन्हेगार आणि दहशतवादी लांडा यांच्यासाठी काम करीत होता. त्याच्यावर १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सांगितले, की लखबीर सिंग लांडा आणि हरविंदर सिंग रिंडा यांच्या सूचनेनुसार त्याने मोहालीमध्ये लोकांना लक्ष्य करून आणि जातीय सलोखा बिघडवूनही हत्या केली होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा