अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यु, वसतिगृहात मृतावस्थेत आढळला, कुटुंबीयांनी व्यक्त केला संशय

अमरावती, २२ जूलै २०२२: अमरावती येथील विद्याभारती माध्यमिक विद्याल्यात शिक्षण घेणाऱ्या व तेथीलच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीचा मृत्यु झाला आहे. आदर्श नितेश कोगे (वय १३) रा. जामली या आदिवासी विद्यार्थीचा संशयास्पद मृतदेह सापडला.

ही घटना उजेडात आल्यानंतर विद्यालय व वसतिगृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. शिवाय, विद्यार्थीही चांगलेच धास्तावले. याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देऊन चौकशी केली.

विद्यार्थ्यांच्या मृत्युचे कारण अधाप समोर आले नाही. अमरावती पोलीस तपास करीत आहेत. मृत आदर्शने बुधवारीच आपल्याला कॉल केला होता. वसतिगृहातील विद्यार्थी आपल्याला मारतात, असे तो म्हणाला होता. आदर्शच्या मृत्यूस वसतिगृह व्यवस्तापन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडील नितेश कोरे यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांकडे एका तक्रारीतून केली. आदर्शचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अहवालानंतर आदर्शचा मृत्यु कसा झाला हे स्पष्ट होईल.

या प्रकरणी जवळपास ९० विध्यार्थीना आई-वडील घरी घेऊन गेले. मुलाच्या मृत्युला महाविद्याल्यात प्रशासन जबाबदार असल्याचा पालकांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस वसतिगृहात तपासणी करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा