गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा संशयास्पद युवक कर्जत पोलिसांच्या ताब्यात

संशयास्पद युवक कर्जत पोलिसांच्या ताब्यात

कर्जत, ३१ ऑगस्ट २०२०:कर्जत तालुक्यातील जेबाळवाडी येथील गहिनीनाथ डोंबाळे यांच्या घरानजीक रविवार रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास एक व्यक्ती दबा धरून बसल्याचे डोंबाळे यांच्या भावजयच्या निदर्शनास आले.
आरडाओरड केला असता या युवकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गहिनीनाथ डोंबाळे ,प्रतिक बाळासाहेब डोंबाळे,गणेश रामदास डोंबाळे,यांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. दरम्यान वस्ती वरील काही लोकांच्या घरावर दगडफेक झाली. या घटनेसंदर्भात तात्काळ पोलिसांनी माहिती देत या युवकाला कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती डोंबाळे यांनी दिली.
सदर पकडलेला व्यक्ती हा नाव सांगत नाही. तो काहीसा वेडसर असल्याचे दिसत आहे. या बाबत अधिक माहिती घेऊन तपास करीत आहोत अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष
error: Content is protected !!
Exit mobile version