शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघट्नेन पूर्ण महाराष्ट्र व्यापला होता, शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी एकवटत होता व चळवळीने जोर धरला होता शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत बिनीचे शिलेदार पैकी एक होते राजू शेट्टी. शिरोळ सारख्या गावांमध्ये शेती करणारे चळवळीत पूर्णपणे झोकून देऊन चळवळीसाठी दिवस-रात्र झटणारे, पण अचानक शरद जोशी यांचा यांचा कल भाजपकडेच वळू लागला व शरद जोशी ने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध करून संघटनेतून बाहेर पडून” स्वाभिमानी शेतकरी संघटना” स्थापन केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कामाची सुरुवात शिरोळ तालुक्यातुन करताना बघता-बघता संघटनेने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पाळेमुळे घट्ट करण्यास सुरुवात केली व महाराष्ट्रात संघटना फोफावत गेली. (राजू शेट्टी यांनी पहिली निवडणूक) संघटनेला निवडणुकीचे दरवाजे खुणावू लागले व राजू शेट्टी संघटनेच्या जोरावर पहिली निवडणूक शिरोळ जिल्हा परिषदेत मतदारसंघातून लढून विजयी झाले. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना शेट्टी यांनी ऊस दरासाठी मोठे आंदोलन उभे केले शिरोळच्या दत्त साखर कारखान्यावर आंदोलन करते वेळी पोलिसांनी केलेल्या लाठी चार्जमध्ये राजू शेट्टी बेशुद्ध झाले होते. इतक्या उग्र स्वरुपाचे आंदोलन राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यात उभी केले. जयसिंगपूर मध्ये दरवर्षी “ऊस परिषद” घेऊन ऊसाला भावाची मागणी करून जोपर्यंत कारखानदार ऊस दर मान्य करत नाही तोपर्यंत कारखान्याचे धुराडे पेटू देत नसत. आज जो ऊसाला चांगला भाव मिळत आहे त्याचे सर्व श्रेय आहे राजू शेट्टी व त्यांच्या संघटनेला जाते हे त्यांचे विरोधकही मान्य करतात.
संघटनेच्या स्थापनेपासून शरद पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात सतत संघर्ष करत आले. जिल्हा परिषदेनंतर विधानसभेच्या आखाड्यात उतरून शिरोळ सारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवून हाती पैसा नाही, सत्ता नाही, तरीही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासावर ही विधानसभेची निवडणूक भरघोस मतांनी निवडून आले. शेतकऱ्यांनी एक- एक रुपये वर्गणी काढून निवडणूक निधी उभा केला. दोन वेळा शिरोळ विधानसभेचे नेतृत्व केल्यानंतर नवीन तयार झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढवून माने घराण्याचा पारंपारिक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या श्रीमती निवेदिता माने यांना पहिल्याच प्रयत्नात धूळ चारली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः शेट्टींच्या पराभवासाठी प्रयत्न करत असूनही शेट्टी विजय झाले. त्यानंतरच्या लोकसभेच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी ज्या शरद जोशींनी भाजप मध्ये जाण्याचा मार्ग निवडला तोच मार्ग निवडून भाजपसोबत आघाडी करून लोकसभेची निवडणूक जिंकली, पण शेट्टींना कृषी क्षेत्राचा अनुभव असूनही मंत्रीपद दिले गेले नाही. (राजू शेट्टी स्वतः निवडून आले) पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेट्टींचे जवळचे सहकारी सदाभाऊ खोत यांना विधान परिषद घेऊन त्यांना राज्यमंत्री केले.इथूनच दोघांचा मार्ग वेगळा झाला .
राजू शेट्टी हे भाजप आघाडीतून बाहेर पडून पुणे ते मुंबई ही आत्मक्लेश ही यात्रा काढून भाजपसोबत जाण्याचा पश्चाताप होत आहे,याच मुळे ही यात्रा काढल्याचे सांगितले. बारामती मधील ऊस दरासाठी आंदोलन ही गाजले होते. पण शेवटच्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने निवडणूक लढवून ही त्यांना हार पत्करावी लागली. त्यानुसार झालेल्या समझोत्यानुसार राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक पद विधान परिषद संघटनेला देण्यात येणार होते एक एक पद विधान परिषद संघटनेला देण्यात येणार होते तेच राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त परिषदे वरच्या आमदारकी साठी राजू शेट्टी यांचे नाव पुढे केले, त्याच वेळी शेट्टींनी बारामतीतील गोविंद बागेत जाऊन शरद पवार साहेबांच्या समोर लोटांगण घातले. हीच बाब दुसऱ्या फळीत शेतकरी संघटनेत काम करणारे रविकांत तुपकर ,जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, महावीर अकोले, अनिल पवार यांनी यांना रुचले नाही, त्यांनी बंडाचे निशाण फडकावले व विरोध केला.
घरच्यांच वार वर्मी बसल्याने संघटना फुटीच्या उंबरठ्यावर कडे जात आहे हे लक्षात येताच दोन पाय मागे सरकण्याचा निर्णय शेट्टींनी जाहीर करून फेसबुकवर तशी पोस्ट ही टाकली, की दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करून एकमेकांबद्दल विश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको वाटते. ” याबाबत कोणीही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू नये” राजू शेट्टी यांच्यासारख्या नेत्यांनी महाराष्ट्रात शेतकरी संघटना जिवंत ठेवली आहे, त्याचबरोबर देशात ही शेतकरी संघटना एकत्र आणण्याचे काम करताहेत . अगोदरच सदाभाऊ मुळे संघटना फुटली. ते आता होता कामा नये, संविधानिक पदामुळे काम करण्याचे बळ येते हे मान्य, पण राजू शेट्टी सारख्या लढवय्याने पाठी मागील दाराने न जातात स्वाभिमानाने विधानपरिषदेत किंवा लोकसभेत जावे तिथे तुमची खरी गरज आहे.
अशोक कांबळे