स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त

सोलापूर : येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले की, प्रदेश पातळीपासून गाव पातळीवरील सर्व पदे बरखास्त करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून राज्यभरातील पदाधिकारी यांची एकाचवेळी नेमणूक होणार आहे. पक्षाची शिस्तपालन समिती कार्यरत करणार आहे.

यासंदर्भात कार्यकर्त्यांना तक्रारी करता येणार आहेत. विभागीय आणि राज्य पातळीवर शिस्तपालन समितीही स्थापन होणार आहे. चळवळ टिकवण्यासाठी संघटनेचा राजकीय स्वरूप होऊ नये. प्रदेश ते गाव पातळीवरील पदे निवडीचा कार्यक्रम पुढील महिनाभरात पार पडणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा