नवी दिल्ली, १३ जानेवारी २०२३ : एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या आरोपी शंकर मिश्राच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी पोलिसांनी कोर्टाकडे आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.
मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचे दिसत आहे. कारण, आरोपी शंकर मिश्रा याने स्वतःवर लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तो म्हणाला, मी महिलेवर लघुशंका केली नाही. उलट संबंधित महिलेनेच लघुशंका केली होती. ज्याचा आरोप माझ्यावर लावला गेला.
नेमके काय आहे प्रकरण?
२६ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका वृद्ध महिलेवर लघवी केल्याचा आरोप शंकर मिश्रावर आहे. मिश्रा कॅलिफोर्निया येथील एका अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनीच्या भारतीय युनिटचे उपाध्यक्ष आहेत.
परंतू ही घटना घडकीस आल्यानंतर त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी चार जानेवारीला आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक