दिवाळीच्या सणानिमित्त पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसाला किमान दोन लाखांच्या आसपास असते.
परंतु, स्वारगेट मेट्रो स्थानकाला एसटी स्थानकाशी जोडणारा भुयारी मार्ग (अंडरपास) अद्याप सुरू झालेला नाही. यामुळे प्रवाशांना जेधे चौकातून धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागतो, ज्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता वाढते.
महामेट्रोकडून एका वर्षापूर्वी स्वारगेट मेट्रो स्थानकाचे उद्घाटन झाले असले तरी भुयारी मार्गाच्या कामात तांत्रिक अडचणी व मर्यादित जागेमुळे अद्याप उशीर होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर एसटी व मेट्रो स्थानकांदरम्यान थेट पादचारी प्रवेश मिळेल, ज्यामुळे जेधे चौकातील गोंधळ, सिग्नलवरील गर्दी व बेकायदा पार्किंगचा त्रास कमी होईल.
एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिवाळीपूर्वी हा भुयारी मार्ग सुरू होण्याची शक्यता कमी आहे; परंतु काम वेगाने सुरू असून लवकरच पूर्ण होईल, असे अपेक्षित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































