स्वराज्याचा सिंह… तान्हाजी मालुसरे

बाळ शिवबाचा मित्र तानाजी मालुसरे…
छत्रपती शिवाजी राजे भोसलेंनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा लढवय्ये सरदार तानाजी मालुसरे…
राजमाता जिजाऊंचा दुसरा मानसपुत्र तानाजी मालुसरे…
सावित्रीचा धनी, रायबाचा आबा आणि सूर्याजीचा थोरले भाऊ तानाजी मालुसरे….
बालपणीच्या मित्राची इच्छा, स्वराज्याच्या छत्रपतींच्या डोळ्यातले अश्रू, राजमाता जिजाऊंच्या अनवाणी चालून पायाला होणाऱ्या वेदना…
अशा सगळ्याचीच परतफेड करण्यासाठी कोंढाणा जिंकण्याचा विडा उचलणारे आणि
साक्षात राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना म्हणजेच साक्षात आई भवानीला साकडे घालून आशीर्वादरूपी हात आपल्या मस्तकावर भाग पडणारे आणि
क्षणाचाही विलंब ना करता… आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे” असा स्वयंघोषित पण आणि वचन घेणारे हिंदवी स्वराज्याचे सरदार तानाजी मालुसरे…

चित्रपट सुरु झाल्यापासून म्हणजे अगदी पहिल्या क्षणापासून ते रायबाचे लग्न आणि सावित्रीचे गाणे संपेपर्यंत ह्या योद्ध्याची कहाणी आपल्याला एकाच ठिकाणी खिळवून ठेवते….
त्यांना होणाऱ्या जखमांची, वेदनांची जाणीव होताच डोळ्यात तरळते अश्रू उभे राहतात…
तर दोन तास दहा मिनिटांच्या ह्या चित्रपटात कदाचित डिड तास हा अंगावर काटे येणे आणि जाणे येणे आणि जाणे ह्यातच संपून जातो
कारण चित्रपटामध्ये दाखविलेली दृश्य, लढाया, गनीमीकावे आणि युक्त्या ह्यांचा इतका बारीक अभ्यास ह्या आधी कुणीही केला नसावा किंवा दाखविला नसावा….

हिंदवी स्वराज्य आणि माझ्या छत्रपती राजेंचा इतिहास इतका दैदिप्यमान आणि भव्य दिव्य असे गड किल्ले माझ्या मते प्रथमच दाखविण्यात येत असावेत.
राजगडाची दाखविलेली छबी, बाजारपेठ, दारुगोळा कोठार, आई भवानीचे मंदिर, सदर, खलबतखाना, सुवेळा माची, संजीवनी माची आणि
स्वतः साक्षात छत्रपती शिवाजी महाराज ज्या माचीवर अष्टमी ची अर्धी रात्र एकटक कोंढाण्याकडे पाहत स्वतः उभे असलेली पद्मावती माची….
सिंहगड म्हणजेच किल्ले कोंढाणा… महादरवाजा, कल्याण दरवाजा, चोर दरवाजा, शंभुमहादेवाचे मंदिर..
असे सगळेच अगदी नयनसुखद, अविश्वसनीय आणि नयनरम्य म्हणजे अगदी मनाला काळजाला भिडणारे असेच….

“माझ्या डोळ्यातले अश्रू आज थांबत नाहीत, ह्याचा अर्थ असा कि माझा तान्ह्याचे रक्त सांडत असणार…
पंत तयारी करा… मी माझ्या तान्ह्याला दिलेली शपथ मोडतोय….!!!”
हे वाक्य ऐकून तर झालेली मनाची स्थिती आणि घालमेल शब्दात व्यक्त करणे अवघड…
एक वेळ मनात नकळत पणे असा विचार येऊन जातो….
कि राजे… तुम्ही थांबा आम्ही जाऊन येतो…
कारण लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जंगलाचं पाहिजेल…!!!

छत्रपती श्री शिवाजीराजे भोसलें हे जेव्हा सरदार तानाजी मालुसरें यांचा शेवटचा मुजरा स्वीकारतात आणि डोळ्यातून ओघळणारे अश्रू नकळतपणे बोलू लागतात कि….
गड आला पण माझा सिंह गेला….. हे ऐकताना तर डोळ्यातून आसवं कधी ओघळू लागतात ह्याची जाणीव होत नाही….!!!

काय लिहू आणि किती लिहू… अर्थात शब्द आणि वर्णन सदैव तोकडे पडणारच….
सर्वानी एकदा थियेटर मध्ये जाऊन पाहावंच आणि तेही थ्रीडी मध्येच आवर्जून पाहावा असा ज्वलंत इतिहास…
निदान दोनदा तरी नकळतपणे पहिला तरी पोट, मन भरणार नाहीच आणि उत्साह देखील कमी होणार नाही….

पहिला मनाचा मुजरा श्री शरद केळकर यांना कि ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले ह्यांची भूमिका साकारण्याचे
शिवधनुष्य उचलले आणि त्या भूमिकेला तितक्याच प्रखरतेने न्याय हि दिला….
दुसरा हा अजय देवगण सरांना कि ज्यांनी श्री ओम राऊत ह्यांच्या इच्छेला दाद देऊन एका हिंदवी स्वराज्याच्या स्थापने पासून
शेवटच्या स्वसापर्यंत जीवाची बाजी लावून अखेर आहुती देणाऱ्या सुभेदार म्हणजेच सरदाराची कहाणी मोठ्या पडद्यावर साकारण्याचे धाडस दाखविले.
आणि तितक्याच ताकदीने आणि जिद्दीने खराखुरा मराठा सरदार तानाजी मालुसरे उभा केला….!!!
आणि तिसरा मुजरा दोघांना (सैफ अली खान कि ज्याने उदयभान राठोड हा कदाचित त्या खऱ्याखुऱ्या उदयभानापेक्षा हि जुजबी निभावला आणि वठविला)
आणिक आपला मराठमोळा जयदत्त नागे कि ज्याने सूर्याजी मालुसरे हा खरोखरच त्याच्या भूमिकेने जिवंत केला…!!! )

 

                                                                                                       राहुल रोहिलकर-पुणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा