स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन

पन्हाळा किल्ल्याहून रायगडाला रवाना होताना संभाजीराजेंनी स्वराज्यातील सर्व किल्ल्यावर दारूगोळा,धनधान्य पाठवियाची व्यवस्था केली. किल्ल्याच्या मजबती करणाकडे किल्लेदारांना लक्ष द्यावयास सांगून आवश्यक साधनसामग्री प्रत्येक किल्ल्यावर पाठविली. यानंतर संभाजीराजेंनी रायगडाला प्रस्थान केले. रायगडाची जनता आपल्या राजाचं स्वागत करावयास गडावर हजर होती. सन १६ जानेवारी १६८१ साली संभाजीराजेंचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला. संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध असणाऱ्या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना संभाजी महाराज यांनी उदांत अंतःकरणाने माफ केले होते आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले होते.

संभाजी महाराज प्रधान मंडळ

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
(सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले)

श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

पंतप्रधान (पेशवा / पेशवे) – निळोपंत पिंगळे (मोरोपंत पिंगळे यांचे जेष्ठ पुत्र)
चिटणीस – बाळाजी आवजी
सेनापती (सरनौबत) – हंबीरराव मोहिते
न्यायाधीश (काझी-उल-ऊझत)- प्रल्हाद निराजी
पंत सुमंत (डबीर /डंबीर) – जनार्दन पंत
पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) – मोरेश्वर पंडितराव
पंत सचिव (सुरनीस / सुरवणीस) – आबाजी सोनदेव
पंत अमात्य (वाकनीस / वाकेनवीस) – दत्ताजी पंत
पंत अमात्य (मजुमदार) – अण्णाजी दत्तो

अष्टप्रधान मंडळा व्यतिरिक्त इतर महत्वाची पदे व या पदांवरच्या महत्वाच्या व्यक्ती खालील प्रमाणे:

मुलकी कारभार – महाराणी येसूबाई
छंदोगामात्य – कवी कलश
पायदळ सेनापती – मोहोळजी घोरपडे
आरमार – दर्या सारंग, दौलत खान आणि मायनाक भंडारी

काही कालांतराने या मंडळीनी परत कारस्थाने केली,तेव्हा कायमची कारस्थाने मोडून काढण्यासाठी अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना छत्रपती संभाजींनी सुधागड परिसरात असणार्‍या परली गावात हत्तीच्या पायी दिले.

छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा -राजमुद्रा

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
मराठी मध्ये अर्थ:
शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व
ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त
अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणून असणार नाही
(कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील)

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा