“माझ्याशी पंगा” या बालनाट्याच्या १०० व्या प्रयोगाला “स्वरंग मराठी” वाहिनीने दिले व्यासपीठ

पुणे, २९ ऑगस्ट २०२०: सध्या कोरोनामुळे नाटक करणाऱ्या कलाकारांची प्रेक्षकांपासून कुठेतरी नाळ तुटल्याचे पाहायला मिळते. पण, कलेबरोबर असलेली नाळ अशा वेळीच आणखी घट्ट होते. आशातच कलाप्रेमी कलेसाठी आणि प्रेक्षकांसाठी वाटेल ते करायला तयार होतात. त्यातीलच एक म्हणजे प्रा. देवदत्त पाठक आणि त्यांची लहान चिमुकल्यांसोबत रसिकांना भुरळ घालणारी टीम.
प्रेक्षकांना आपल्या पर्यंत यायला जमलं नाही तर काय झालं. आपण त्यांच्या पर्यंत पोहचू असा निर्धारच त्यांनी केला आणि पालकांची डोकेदुखी बनलेल्या मोबईलच्या माध्यमातूंनच त्यांनी ऑनलाईन नाटक सुरु करायचं ठरवलं आणि त्यांचा हा प्रयोेग यशस्वी झाला.

गिनीज वर्ल्ड बुक ने घेतली दखल

या मेहनतीमधून “माझ्याशी पंगा” या बालनाट्य कलाकृतीचा जन्म झाला आणि ऑनलाईन प्रयोग सुरु करण्यात आले. त्यानंतर या कलाकृतीची यशस्वी घौडदौड सुरु झाली, तर या बालनाट्याची दखल गिनीज वर्ल्ड बुक ने घेतली. नुकतेच शनिवारी या बालनाट्यांने १०० वा यशस्वी ऑनलाईन प्रयोग केला.

“स्वरंग मराठी” वाहिनीने दिले व्यासपीठ

“माझ्याशी पंगा” या बालनाट्याच्या १०० व्या प्रयोगाला मराठी मनोरंजन विश्वात लवकरच पदार्पण करणाऱ्या “स्वरंग मराठी” या वाहिनीनं ऑनलाईन व्यासपीठ देत या नाटकाला थेट प्रेक्षकांपर्यंत पोहचवले. ज्याला प्रेक्षकांनी देखील भरभरुन प्रतिसाद दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा