स्वरंग प्रस्तुत “आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” ची उत्साहात सांगता

पुणे : ‘स्वरंग’ एंटरटेनमेंट प्रस्तुत “आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” दि.११ व १२ जानेवारी रोजी फर्ग्युसन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पार पडला. या लघुपट महोत्सवात विविध देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या लघुपटात विविध विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले .
यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सिंह परदेशी यांनी सांगितले की, फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये मीडिया अँड कम्युनिकेशन या विभागाची सुरुवात ही २०१४ मध्ये झाली असून याची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याचप्रकारे आंतरराष्ट्रीय लघुपट महाविद्यालयात होणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयाचा आपण एक भाग असल्याचा खूप अभिमान आहे, असे चित्रपट दिग्दर्शक क्रांती कानडे यांनी सांगितले. तसेच स्वतःला जे मांडायचे आहे ते प्रामाणिकपणे मांडायला शिका. कोणतीही चांगली कलाकृती घडवण्यासाठी आधी चांगला माणूस व्हावे लागते. आंतरिक जाणीव व स्व प्रेरणा या गोष्टी देखील या प्रक्रियेसाठी खूप महत्वाच्या आहेत. अश्या प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या महोत्सवाची सांगता रविवार (दि.१२) रोजी झाली.

या महोत्सवावेळी चित्रपट दिग्दर्शक क्रांती कानडे, दिग्दर्शक आशिष पांडे महोत्सवाचे प्रायोजक स्वरंग टीमचे प्रोडक्शन हेड प्रवीण वानखेडे, किरण लोहार आणि अमित रानवडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र सिंह परदेशी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सविता केळकर, मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. स्वप्नील कांबळे प्रा. किमया मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

या लघुपटांना मिळाले पुरस्कार :
विशेष परीक्षक पुरस्कार- रिवायव्हल (बांगलादेश) , उत्कृष्ट माहितीपट पुरस्कार- द कॉल ऑफ खंडाधर हिल्स (भारत), उत्कृष्ट स्क्रीन प्ले पुरस्कार-फायर लीली (बेल्जियम), उत्कृष्ट छायाचित्रण पुरस्कार- अ ब्रँड न्यू टीव्ही (सर्बिया), उत्कृष्ट कथा पुरस्कार- मनिक्युअर (इराण), उत्कृष्ट अॅनिमेशन पुरस्कार टँगल(इराण), उत्कृष्ट ध्वनी पुरस्कार क्रॅकल्ड स्कल्स (बेल्जियम), उत्कृष्ट नेपथ्य पुरस्कार- द स्ट्रेंजर अँड द विंड (इराण) आणि उत्कृष्ट संकलन पुरस्कार- ट्राईब (स्पेन).

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा