स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा युवामोर्चा कडून रक्तदान शिबिर

पाथर्डी , दि.४ जून २०२० : स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या पुण्यतिथी निमित्त भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, मुकुंद गर्जे यांच्याकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड, शहराध्यक्ष अजय भंडारी, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे ,अर्जुन धायतडक, नगरसेवक प्रवीण राजगुरू आदींची उपस्थिती होती .

मुंडे कुटुंबीयांबरोबर सदैव असणारे व त्यांचे कट्टर समर्थकांपैक एक तालुक्यातील अशोक गर्जे, अमोल गर्जे व मुकुंद गर्जे हे सर्वदूर परिचीत आहे.आजही माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत आजपर्यत राजकीय व सामाजिक कार्याची वाटचाल चालू आहे.
मुंडे यांच्या आदेशानंतर तालुक्यात घडामोडींना वेग आण्याचे काम गर्जे यांच्याकडून होत आहे. त्याच दृष्टीने माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचनेनंतर हे शिबिर घेण्यात आले .
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन कार्यक्रम होऊन त्यानंतर सुमारे ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा