सफाई कर्मचाऱ्याची मुलगी लंडनमध्ये घेणार उच्चशिक्षण

इंदापूर, दि. ३० ऑगस्ट २०२०: इंदापूर नगरपालिकेतील सफाई कर्मचारी रमेश ऊकिरडे यांची कन्या तेजस्वी हीने जिद्दीने औरंगाबाद येथे फाॅरेन्सीक सायन्समध्ये उच्च शिक्षण पूर्ण  केले. त्यानंतर तिची मास्टर डिग्रीसाठी लंडन येथील टेस्सीड विद्यापीठात निवड झाली. परंतु हलाखीची परिस्थिती असल्याने तिला व्हिसा व तिथे पोहचण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. ही बाब युवा क्रांती प्रतिष्ठानच्या लक्षात आल्याने त्यांनी मदतीचे अवाहन केले होते. त्या आवाहनास ऊदंड प्रतिसाद मिळाला.

यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ५० हजार रू. रोख मदत जाहीर केली. तसेच अनिता लोढा आणि पियुष बोरा यांनी प्रत्येकी १० हजार रुपये , धरमचंद लोढा यांची कन्या तृप्ती नहार यांनी पाच हजार रुपये तसेच मिलींद कौलगी, प्रकाश फलफले, नविनकुमार गायकवाड, बाळासो क्षिरसागर, प्रशांत शिताप आणि महादेव लोखंडे आदींसह अनेकांनी तेजस्वीच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली आहे. यावेळी दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन तेजस्वीला मदत करीत असताना तेजस्वीने ही भविष्यात तिच्या सारख्याच एखाद्या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला मदत करावी एवढीच अपेक्षा व्यक्त केली.

”तुमची मदत तेजस्वी सारख्या प्रतिकूल परिस्थिती स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी लढणाऱ्या त्या प्रत्येक विद्यार्थी/विद्यार्थीनीला प्रेरक असेल.” असे मत युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत शिताप यांनी न्यूज अनकटशी बोलताना व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा