गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यु; अद्यापही मृतदेहाचा शोध सूरु

पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यु; अद्यापही मृतदेहाचा शोध सूरु

भंडारा, १५ सप्टेंबर २०२२: मित्रांसोबत पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील चाना येथे घडली आहे. आदित्य विजय वाघाये वय वर्ष १७, रा. केसलवाडा असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.

तो निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावीचा विद्यार्थी होता. आदित्य आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी नाल्यावरील बंधाऱ्यावर गेला होता. नाल्याच्या बाजूला कपडे आणि चपला काढून तो पाण्यात पोहण्यासाठी शिरला. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

ही बाब त्यांच्यासोबत असलेल्या मित्राला लक्षात येताच त्याने मोबाईल द्वारे ही माहिती आदीत्यच्या कुटुंबियांना दिली. घरच्यांनी ही माहिती मिळाल्यानंतर लखनी पोलीस स्टेशनला दिली. यानंतर केसलवाडा-वाघ येथील पोहणाऱ्या युवकांच्या मदतीने आदीत्यचा शोध घेण्यात आला.

मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्यात बाधा निर्माण होत आहे. त्यामुळे अद्यापही पोलीस घटनास्थळी थांबुन आदीत्यचा शोध घेत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version