सव्वा दोनशे खाटांचे रुग्णालय वेळेत पूर्ण करा: खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद, दि.५जून २०२० : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व अभियंते यांची योग्य सोशल डिस्टंसिंग पाळत सुभेदारी विश्राम गृह औरंगाबाद येथे महत्वपुर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत विकासात्मक विषयावर चर्चा करुन आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या सर्व विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणाऱ्या विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे, अशा सर्व कंत्राटदारावर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी, अश्या सुचना खासदार इम्तियाज जलील यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच विकास कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि निकृष्ठ दर्जाच्या कामांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांची अजीबात गय केली जाणार नाही असे सुध्दा खासदार जलील यांनी स्पष्ट केले.

खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरात महिला व शिशुसाठी तयार करण्यात येणारे २०० खाटांचे रुग्णालय विहीत वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिल्या. विषेश म्हणजे सदरील रुग्णालयासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य पाहता त्वरीत रुग्णालयाचे काम सुरु करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते.

याव्यतिरिक्त केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पिय कामे आणि अर्थसंकल्पिय इमारती या योजनांतर्गत येणाऱ्या रस्ते, पुल व इमारतीविषयी तसेच व्दिवार्षिक देखभाल दुरुस्तीचे कामे, रस्ते व पुल परिक्षण दुरुस्ती विषयी व शासकीय निवासी आणि अनिवासी इमारती दुरुस्ती संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहरातील आणि वैजापूर, कन्नड, गंगापूर व खुलताबाद येथील रस्त्याविषयी चर्चा करुन ज्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.

न्युज अन कट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा