टी-९० टँक आणि टी-७२ टँक लडाख मध्ये तैनात

लडाख, २७ सप्टेंबर २०२०: पूर्व लडाखमध्ये चीनसोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना करण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे. चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चुमर-डोमेचोक भागात एलएसीजवळ टी -९० आणि टी -७२ टँकसह  कॉम्बेट व्हीकल्स तैनात केली आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते नियंत्रण रेषेवरील जवळपास ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानात कार्य करण्यास सक्षम आहेत.

एएनआयशी बोलताना १४ कॉर्प्सचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल ए रवींद कपूर म्हणाले की, ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’ हे भारतीय सैन्याचं एकमेव निर्माण आहे ज्यामुळं अशा कठोर भागात यांत्रिकी सैन्य तैनात केलं आहे. या भागात टँक, पायदळ लढाऊ वाहने आणि भारी तोफा राखणं हे एक आव्हान आहे. क्रू आणि इक्विपमेंट तयारी सुनिश्चित करण्यासाठी आज आपल्या सर्व लॉजिस्टिक तयाऱ्या पुरेश्या आहेत.

ते म्हणाले की, या वेळेस लडाखमध्ये थंडी खूप कडाक्याची पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व तयाऱ्या देखील पूर्ण झाल्या आहेत. आपल्याजवळ जास्त कॅलरी असणारं अन्न तसेच न्यूट्रिशन असणार धान्य देखील आहे. इंधन, खाद्यतेल, कपडे, हीटिंग अप्लायंस आवश्यक असलेल्या गरजेप्रमाणं उपलब्ध आहे. सध्या ह्या वाहनांसाठी सैन्य ३ प्रकारचं इंधन वापरतात आहे. याचं कारण असं आहे की, जेव्हा थंडी आपल्या चरम सीमेवर असंल तेव्हा या वाहनांमध्ये कोणत्या प्रकारचं इंधन योग्यरित्या काम करू शकतील हे देखील यातून समजू शकत.

जगातील अचूक निशाणा असणाऱ्यांपैकी एक आहे टी-९० टँक

जगातील सर्वात अचूक टँक पैकी एक म्हणून टी-९० टँकला ओळखलं जात. एक मिनिटांमध्ये नऊ गोळे डागण्याची क्षमता या टी-९० टँक मध्ये आहे. इतकंच काय तर सर्व प्रकारच्या जैविक आणि रासायनिक हत्यारांचा सामना करण्यासाठी देखील टी-९० टँक सक्षम आहे. एक हजार हॉर्सपॉवर क्षमता असलेला हा टी-९० टँक दिवस आणि रात्र कार्यरत राहू शकतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे टी-९० टँक ७२ किलोमीटर प्रतितास या वेगानं धावू शकतो. वास्तविक, रशिया वरून टी-९० टँक भारतानं विकत घेतले होते. मात्र, आता याचं आधुनिकीकरण करून भारतातच त्यांचं उत्पादन केलं जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा