टी ट्वेंटी विश्वचषक; भारत- पाकिस्तान ‘सामन्याची’ क्रेझ, तिकिटे काही क्षणात खल्लास!

पुणे, १७ सप्टेंबर २०२२ : ऑस्ट्रेलियामधील टी ट्वेंटी’ विश्वचषक’ २०२२ ला अजून एक महिना बाकी आहे. पण त्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. टी ट्वेंटी ‘विश्वचषक’ मध्ये २३ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची तिकीटे काही मिनिटांतच विकली गेले आहेत.

तर या स्पर्धेतील सामन्यांसाठी पाच लाख पेक्षा जास्त तिकिटे चाहत्यांनी बुक केली आहेत. याबाबत अधिक माहिती देताना आयसीसी ने प्रेस रिलीज केले. ज्यामध्ये त्यांनी भारत पाकिस्तान सामन्याची तिकिटे काही मिनिटातच विकली गेली असल्याचे सांगितले.

आशिया कप २०२२ स्पर्धेतील साखळी सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला, त्यानंतर टीम इंडियाला सुपर फोर मध्ये पाच विकेट्स ने पराभवाचा सामना करावा लागला. आशिया चषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. टी ट्वेंटी विश्वचषक २०२२ मध्ये २३ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मेलबर्नमध्ये हा सामना होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा