विशाखापट्टणम, २३ नोव्हेंबर २०२३ : आज २३ नोव्हेंबरपासून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. ज्याचा पहिला सामना राजशेखर रेड्डी एसीए- व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापट्टणम येथे होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत २६ सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने १५ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने १० सामने जिंकले असून एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर १० टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने ६ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने ४ सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत टी-२० मालिकेत भारताचा दबदबा पाहायला मिळत आहे.
या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, केएल राहुल यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंसह अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव या मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे. तर उपकर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. या मालिकेकडे टीम इंडियाच्या २०२४ टी-२० विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.
भारतः इशान किशन (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध्द कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, अरॉन हार्डी, जोश इंग्लिश, मार्कस स्टोइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (सी/डब्ल्यू), शॉन अ बॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड