पुणे, ३ मार्च २०२३ : वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी गारवा, तर दुपारनंतर उन्हाच्या झळा जाणवत आहेत. काही वेळा उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागल्याचे जाणवते. अशातच महाराष्ट्रात उद्या शनिवारपासून (ता. ४) अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असून, ६ मार्चपर्यंत अशी परिस्थिती असणार आसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर-दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि दक्षिण मध्य प्रदेशमध्येही ४ ते ६ मार्चदरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील मराठवाडा, उत्तर कोकण आणि विदर्भावर कमी दाबाचा सर्वाधिक प्रभाव जाणवणार असून, या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
ता. ४ ते ५ मार्चला पश्चिम मध्य प्रदेश, ५ ते ६ मार्चला पूर्व मध्य प्रदेश, तर ६ मार्च रोजी विदर्भात गडगडाटांसह पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तविली आहे. तरी शेतकरी बांधवांनी सतंर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर