ताक आणि त्याचे फायदे….

दही जरी तत्वतः उष्ण असलं तरी ताक मात्र गुणधर्माने थंड असते. ताक पिण्याचे अनेक फायदे आपल्या त्वचेपासून पचनक्रियेपर्यंत होतात. जाणून घेऊ याबद्दल अधिक:

ताक पचण्यात सोपे असते. याने लिक्विड डायट देखील पोटाला मिळते.

ताकात व्हिटॅमिन बी १२, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फास्फोरस सारखे तत्त्व असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

ताक कोलेस्टरॉल नियंत्रित करण्यात मदत करते. यात बायोअॅक्टिव्ह प्रोटीन असते. ज्याने कोलेस्टरॉलवर नियंत्रण राहतं. ताक हाय ब्लड प्रेशरला देखील नियंत्रित करते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा