तारक मेहता का उल्टा चष्मा’ची १५ वर्षे पूर्ण

मुंबई, २९ जुलै २०२३ : २००८ साली सुरू झालेल्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा ही वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत असते आज या मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाले आहे. या मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाले असले तरी या मालिकेची क्रेझ कायम आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या पहिला भागाचं २८ जुलै २००८ रोजी प्रसारण झालं होतं. निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेचं कथानक प्रेक्षकांना चांगलच आकर्षक करून गेलं आहे, आतापर्यंत मालिकेचे ३८०३ एपिसोड पूर्ण झाले आहेत. १५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेचा एक विशेष भाग प्रसारित करण्यात आला आहे. या विशेष भागात मालिकेतील सर्व कलाकार गोकुळधाम सोसायटीमध्ये पावसात धमाल मस्ती करताना दिसून आले आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी गेल्या १५ वर्षांत मालिकेला निरोप दिला आहे. मालिकेत सोढीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता गुरूचरण आणि मिसेस रोशनची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर, रोशनी आणि रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रिया अहुजानं देखील मालिका सोडली आहे. सोनूची भूमिका साकारणारी निधी, बावरीची भूमिका साकारणारी मोनिका, अंजलीची भूमिका साकारणीरी नेहा मेहता, टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकट, तारक मेहताची भूमिका साकारणारा शैलेश लोढा या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. तसेच या मालिकेचा महत्त्वाचा भाग असणारी दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी मॅटरनिटी लिव्हनंतर मालिकेत पुन्हा दिसलेली नाही. तसेच जेठालाल या मुख्य किरदार मुळे मालिकेला रस आहे असे म्हणणे ही वावग नाही.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचा भारतासह जगभरात मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आवडीने बघतात या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. दयाबेन, जेठालाल, पोपटलाल, बबिताजी, अय्यर, भिडे अशा मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दिवसेंदिवस या मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. गेल्या वर्षी निर्मात्यांनी या मालिकेची कार्टून सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता नुकत्याच एका मुलाखतीत निर्माते असित कुमार मोदी यांनी या लोकप्रिय मालिकेवर सिनेमा येणार असल्याची घोषणा केली आहे.

असिद कुमार मोदी बोलतात की तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आज १५ वर्षानंतरही प्रेक्षक ही मालिका पाहायला पसंती दर्शवत आहेत. आज ही मालिका प्रेक्षक फक्त छोट्या पडद्यावरच नाही तर ओटीटी, युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरदेखील पाहत आहेत. मालिकेतील जेठालाल, बबीता, दयाबेन, सोढीसह अनेक पात्र आज अनेक कुटुंबाचा भाग झाले आहेत. १५ वर्षांपासूनच प्रेक्षकांचं प्रेम आजही कायम आहे, असित कुमार मोदी पुढे म्हणाले की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेवर आता मी सिनेमा बनवणार आहे. हा अॅनीमेटेड सिनेमा असून लवकरच या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल

आश्चर्य बाब म्हणजे गोकुळधाम सोसायटीत एकही घर नाही, हा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी खास सेट तयार करण्यात आला आहे. या मालिकेचं चित्रीकरण गोरेगाव फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. फिल्मसिटीमध्ये ‘गोकुळधाम सोसायटी’चा सेट बांधण्यात आला आहे. मात्र, या सोसायटीत ना कुठलं घर आहे, ना इथे कुणी राहतं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा