बारामती शहरातील बजाज फायनान्स कडुन ग्राहकांना तगादा व अरेरावीची भाषा

बारामती, दि. १८ जून २०२० : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत या कठीण प्रसंगी नागरिकांना रोजचे जगणे मुश्किल झाले होते. यावर उपाय म्हणून रिजर्व बँकेने बँक , फायनन्स कंपनी, संस्था यांना लॉकडाऊन व पुढील तीन महिन्यांच्या काळात कर्जदाराला हप्ता व त्यापोटी झालेल्या दंडाचा तगादा लावू नये यासाठी निर्देश दिले होते. मात्र तरी देखील बारामती शहरातील बजाज फायनन्स कंपनी त्यांच्या कर्जदाराला सतत फोन करत अरेरावीची भाषा वापरात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाने लोकडाऊनचा निर्णय घेतला होता या २ महिन्यात सर्व व्यवहार बंद असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे
होमलोन, कारलोन, पर्सनललोन, तसेच प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडून घरगुती वस्तु , टीव्ही, मोबाईल, अशा वस्तू हप्त्यावर घेतल्या होत्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या सर्व आर्थिक संस्थांना कर्जाच्या हप्त्याच्या बाबतीत तगादा लावू नये असे स्पष्ट निर्देश दिले असताना देखील बारामती शहरातील बजाज फायनान्स कंपनी कडुन त्यांनी नेमलेले हे ग्राहकांना हप्त्यासाठी फोन करून अरेरावीची भाषा वापरात असल्याच्या अनेक तक्रारी राजे ग्रुप यांच्याकडे आल्या.

आज बजाज फायनान्सच्या कार्यालयात जाऊन राजे ग्रुप यांच्या वतीने ३१ ऑगस्ट पर्यंत नागरिकांना हप्ता कपात करू नये व लॉकडाऊन काळात ग्राहकांचे बाऊन्स झालेले हप्ते व त्यासाठी लागलेला दंड माफ करण्यात यावा अशी मागणी राजे ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच बजाज फायनन्स कंपनी बाबत कोणाची तक्रार असेल तर राजेग्रुपशी संपर्क साधावा असे आवाहन राजे ग्रुपचे प्रमुख गणेश कदम यांनी केले आहे.

यावेळी सलीम शेख,धिरज पवार, श्रेणीक जाधव , अन्सार अत्तार,अमित परदेशी,जावेद बागवान,कृष्णा क्षीरसागर,अमोल भिंगारे उपस्थित होते. राजेग्रुपने जे निवेदन दिले आहे ते आम्ही आमच्या वरिष्ठांकडे पाठवणार आहे त्याबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो कळवण्यात येईल असे बजाज फायनन्स शाखाधिकारी कन्हैयालाल अय्यर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा