बारामती, २३ जानेवारी २०२१: बारामती तालुक्यातील मोढवे गावच्या हद्दीमध्ये खडीमशिन राजरोसपणे चालू आहेत. खडीची वाहतूक गाड्यांमुळे मोढवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. मोढवे परिसरातील ग्रामस्थांना मोठा फटका व त्रास सहन करावा लागत आहे.
मोढवे गावाच्या परिसरातील असणाऱ्या तीन खडी मशीनमुळे होणाऱ्या धुळी मुळे नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर पिकांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. तेथे होणाऱ्या स्फोटामुळे घरांना तडे गेले असुन परिसरात उडणाऱ्या धुळीमुळे शेतात काम करणे अवघड झाले आहे. पाषाण फोडण्यासाठी केलेल्या स्फोटामुळे परिसरामध्ये पाण्याची पातळी घटली आहे. तर आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असुन या त्रासामुळे आमच्यावर गाव सोडण्याची वेळ येऊ शकते अशी भीती मोढवे गावातील शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणी २४-१२-२० रोजी बारामती तहसीलदार यांना निवेदन दिले होते.मात्र खडीक्रशर वर कोणतीही कारवाई झाली नाही.याप्रकरणी शनिवार दि.२३ प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले असुन मंगळवार दिनांक २ फेब्रुवारीला प्रशासन भवन प्रांत कार्यालय येथे एकदिवसीय लक्षणिक उपोषण समस्त मोढवे ग्रामस्थ यांच्यावतीने करणार आहोत. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर, माणिकराव काळे, संपतराव टकले, गजानन कोळपे, दशरथ कोळपे, दादासो मोटे, धोंडीबा टेंगले यांनी निवेदनात म्हटले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव