पावसाळ्यात तुमच्या कुत्र्यांची काळजी घ्या,..

पुणे, २२ जुलै २०२२: पावसाळयात कुत्र्यांना फिरवायला नेणं जिकरीचं काम आहे. पावसाळ्यात कुत्र्यांची निगा राखणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी महत्त्वाच्या टिप्स…

१. आठवड्यातून दोन वेळा कुत्र्यांना अंघोळ घाला. पावसाळ्यात चिखलाने अंग खराब होऊन किडे होण्याची शक्यता असते.

२. कुत्र्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या आहारात बदल करा. पावसाळ्यात कुत्र्यांचे खाणे कमी होते. यासाठी त्यांच्यासाठी पौष्टिक अन्न, डॉग फूडचा समावेश करा.

३. कुत्र्यांसाठी आता ॲक्सेसरीज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यात कुत्र्यांचे बूट आणि रेनकोट हे आवश्यक आहे. ते नक्की खरेदी करा.

४. महिन्यातून एकदा कुत्र्यांना व्हेटरिनरी डॉक्टरांकडे नेऊन त्याचे चेकअप करा.

५. सध्या कुत्र्यांसाठी ग्रुमिंग सेशन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचा वापर करा.

६. पावसाळ्यात केसाळ कुत्र्यांना गोचीड पकडत असतात. यासाठी कुत्र्यांसाठी गोचीड काढण्यासाठी टाल्कम पावडर मिळते, तीचा वापर करा.

७. तुमच्या कुत्र्यांबरोबर थोडा वेळ घालवा. माईंड रिलँक्सेशन हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

८. कुत्र्यांची नखे वेळच्या वेळी कापा. त्यात फंगस होऊन कुत्र्यांना इजा होण्याची शक्यता असते.

९. कुत्र्यांच्या दातांची वेळोवेळी स्वच्छता आवश्यक आहे. अन्यथा कुत्र्यांच्या तोंडाचा वास येऊन किळस येण्याची शक्यता असते.

१०. कुत्र्यांना खेळण्यासाठी योग्य ती खेळणी आणा. जेणेकरुन त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन तो एक उत्तम कुत्रा म्हणून डॉग शोमध्ये उतरु शकेल आणि उत्तम पाळीव प्राणी होऊ शकेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा