नियमाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करा : सचिन बारवकर

लोणी काळभोर,२८ जून २०२० : आज दि. २८ जून रोजी पूर्व हवेलीत कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने हवेलीचे प्रांत अधिकारी सचिन बारवकर यांनी आज लोणी काळभोर येथे महत्वपूर्ण बैठक घेऊन आरोग्य महसूल व पोलिस प्रशासनाला नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. जो व्यक्ती मास्क वापरणार नाही तसेच सार्वजनीक ठिकाणी रस्त्यावर थुंकल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

कदमवाकस्ती, शेवाळेवाडी, कुंजीरवाडी, थेऊर, उरुळी कांचन यासारख्या मोठ्या लोकसंख्येत दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी यावर अटकाव घालण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे. परंतू ग्रामस्थ यासाठी प्रशासनाला मदत करत नसतील नियमाचे पालन करत नसतील तर ग्रामपंचायत पोलिस व महसूल यांनी हरकतीत येऊन दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

लोणी काळभोर कार्यालयात पार पडली यावेळी तहसीलदार सुनील कोळी हवेलीचे उपसभापती युगंधर काळभोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के हवेलीचे आरोग्य अधिकारी डाॅ सचिन खरात थेऊरच्या मंडलाधिकारी गौरी तेलंग वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, लोणी काळभोर सरपंच आश्विनी गायकवाड उपसरपंच राजाराम काळभोर लोणी काळभोर प्राथमीक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ. दगडू जाधव आदी उपस्थित होते. तसेच लग्न समारंभात केवळ पंन्नास व्यक्तींना परवानगी दिली आहे. यावर जास्त व्यक्ती आढळून आले तर वर वधूसह पुरोहित कार्यालय मालक यांच्यावर खटला दाखल केला जाईल हे त्यांनी नमुद केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा