माढा, १९ सप्टेंबर २०२० : माढा तालुक्यातील टाकळी टे या गावातील गेली सात दिवस झाले ट्रांसफॉर्मर जळाला असून महावितरणच्या टेंभुर्णी येथील कार्यालयात अनेक वेळा माहिती देऊन देखील हा ट्रांसफॉर्मर दुरूस्त केला नाही की कोणी या ट्रांसफॉर्मरचा काय घोटाळा झाला आहे हे सध्या महावितरणचा कर्मचारी पहायला देखील आले नाही.
गावात सात दिवस झाले लाईट नसल्याने गावातील तलाठी, ग्रामपंचायत या कार्यालयातील कामकाज ठप्प असून शेतकरी वर्ग व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे मिळेणात व सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे लागतात व एडमिशन कालावधी असून या सर्व विद्यार्थ्यांच्या नुकसानीस महावितरणचा भोंगळ कारभार जबाबदार आहे.
कोंढार भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या भागात जवळपास उजनी,भिमानगर, आढेगाव, रूई, आलेगाव, चांदज,टाकळी,गार अकोले,वडोली,रांझणी अशी नऊ ते दहा गावे आहेत या भागात गेली महिना ३३ केव्ही लाईन फोल्टच्या नवा दिवस दिवस लाईट नसते हा फाँल्ट वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांना निघाला नसून शासनाने आँनलाईन शिक्षणाचा घाट घातला असून आँनलाईन शिक्षणासाठी लाईटच नाही तर टिव्ही व मोबाईल पहायचे कधी व केंव्हा हे महावितरणच्या अधिका-यांनी सांगावे याला जबाबदार कोण असे टाकळी गावच्या ग्रामपंचायत सदस्या वैशाली दादासाहेब कळसाईत यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देवून दोन दिवसात यावर तोडगा निघाला नाही तर महावितरणच्या टेंभुर्णी येथील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील