तलावपाळीजवळ तरुणीचा मृतदेह सापडला

ठाणे: नजिकच्या काळात मुंबई, ठाणे परिसरात हत्या आणि आत्महत्येच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वीच माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर एका बेवारस सुटकेसमध्ये पुरुषाच्या हातपायांचे तुकडे आढळले होते. दरम्यान आज ही अशी एक घटना समोर आली आहे. शहरातील तलावपाळी परिसरात दररोज सकाळी शेकडो लोक वॉकिंग आणि जॉगिंगसाठी जात असतात. वॉक करत असलेल्या काहींना तलावपाळी परिसरात एका तरुणीचा मृतदेह पडला असल्याचे दिसले. त्या लोकांपैकी काहींनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
या तरुणीने तलावात उडी मारून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा फक्त अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांसमोर या घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. युवतीने आत्महत्या केली आहे की तिची कोणत्या कारणावरून हत्या करण्यात आली आहे. जर आत्महत्या असेल तर त्याचे कारण काय असू शकते असे प्रश्न पोलिसांसमोर पडले आहेत. सध्या या घटने बाबत पोलीस तपास करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा