सर्व शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी वेळेत करावी, तलाठी विष्णू कदम यांचे शेतकऱ्यांना आवाहन

फलटण, सातारा २१ जुलै २०२३ :
तालुक्यातील आसू मंडल चे मंडल अधिकारी दिलीप कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सध्या शासनाच्या महसूल विभागची विविध प्रकारची कामे सुरू आहेत. नुकतेच आसू येथे तलाठी विष्णू सदाशिव कदम यांनी शेतकऱ्यांना ई पिक पाहणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

शेतकऱ्यांना ई सातबारा व ऑनलाईन बाबत आसू चे तलाठी कदम यांनी प्रत्यक्ष शेतावरती जाऊन आज पीक पाहणी कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले. त्याचबरोबर त्याचे महत्त्वही शेतकऱ्यांना सांगितले. ई पीक पाहणीबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर, शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी चे ॲप डाऊनलोड करून त्याची माहिती समजावून घेतली.

या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आसू मंडळातील सर्व शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी करावी असे आवाहन आसू मंडल चे मंडल अधिकारी दिलीप कोकरे व आसूचे तलाठी विष्णू कदम यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा