तळीरामांची करामत, दारु नाही म्हणून सेैनिटायझर केले प्राशन आण ९ जणांनी गमवला जीव……

आंध्रप्रदेश, ३१ जुलै २०२०: कोरोनाच्या या महामारी मध्ये कधी कुठे काय घडेल ते सांगता येणार नाही.आणि त्यात जर भारतासाखा देश असेल तर नवलच, त्यामध्ये प्रशासन देखील या महामारी मध्ये आपले काम करत आहे. मात्र निर्बंधाचे पालन हे भारतीय करतील ते कसले. लाॅकडाऊन मुळे अनेक समस्यांना भारतीयांना जावे लागत आहे.तर भारताची ढासळलेल्या अर्थव्यस्थेला हातभार लावणारे मद्यप्रेमेंची हि घटना आहे.

आंध्रप्रदेशच्या प्रकाशम जिल्हातील कुरचेडू गावामधे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या हि वाढत असून तेथील प्रशासनाने यासाठी पुन्हा एकदा लाॅकडाऊनचा पर्याय निवडला आहे. या दरम्यान मद्यप्रेमींना दारु मिळत नसल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून २० जणांनी सैनिटायझर प्यायला सुरवता केली.आणि काही दिवसातच त्यांच्यातील अनेकांची तब्येत हि खराब झाली त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि ३ दवसात २९ जुलै ते ३१ जुलै दरम्यान ९ जणांनी आपले प्राण गमावले.सैनिटायझर मुळे ९ जणांचा असा दुर्दैवी अंत झाला.यामध्ये २५ ते ६५ वयांच्या व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

लाॅकडाऊन मुळे महाराष्ट्रात देखील मद्य विक्रीस बंदी होती तेव्हा तळीरामांचे मोठ्या प्रमाणात परवड होत होती. तेव्हा एक दोन शहरात असे सैनिटायझरच्या प्राशन करण्याचा घटना घडल्या होत्या.त्या वेळी काहींची तब्येत खराब झाली होती तर एकाने (अंदाजे) आपला जीव गमावला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा