तानाजी सावंतानी आयोध्याला पाठवले ५ हजार लिटर तुप

धाराशिव, १९ जानेवारी २०२४ : भगवान श्रीराम अवघ्या भारतभूमीचे श्रद्धास्थान आहेत. ५०० वर्षांच्या प्रतिक्षेचा अंत होऊन प्रभू श्रीराम आपल्या घरात विराजमान होणार आहेत. प्रत्येक रामभक्त कृतकृत्य होईल असा हा क्षण आहे. अवघा देश २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराममय होणार असून संपूर्ण भारतात दिवाळी साजरी होणार आहे.

प्रभू श्रीरामांच्या आगमनाच्या प्रसंगी रामभक्तीचे कर्तव्य म्हणून आपणही खारीचा वाटा उचलावा हा निर्मळ हेतू मनात ठेऊन डॉ. तानाजी सावंत यांनी श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी, संपूर्ण धार्मिक विधी व होम हवनसाठी लागणारे ५००० लिटर गीर गाईचे तूप पवित्र अयोध्या नगरीमध्ये राजस्थान येथून पाठविले आहे. यावेळी ‘ज्या श्रीक्षेत्र अयोध्येत भगवान श्रीराम विराजमान होणार आहेत त्या ठिकाणी सेवा देण्याची संधी मला मिळाली हे मी माझं जन्मोजन्मीचं भाग्य समजतो’, असे डॉ. तानाजी सावंत म्हणाले. तसेच येत्या २२ जानेवारी रोजी ही प्राणप्रतिष्ठापना होणार असून आपण सर्वांनी आपल्या जवळच्या मंदिरांमध्ये जाऊन रामजप करावा आणि रामरक्षा पठण करावे त्याचबरोबर आपल्या घरी पाच दिवे लावून हा आनंदोत्सव साजरा करावा. असे आवाहनही आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी जनतेस केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा