गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘तानाजी’ द अनसंग वॉरिअर’चा ट्रेलर प्रदर्शित

‘तानाजी’ द अनसंग वॉरिअर’चा ट्रेलर प्रदर्शित

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक विश्वासू मावळ्यांपैकी तानाजी मालुसरे हेसुद्धा एक होते. त्यांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेल्या ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

तानाजीचा ट्रेलर अत्यंत दमदार असून अजय देवगण आणि सैफ अली खानाने परस्परविरोधी भूमिका ताकतीने पेलल्या आहेत.ट्रेलरमधील संगीत तसेच संवाद अंगावर शहारे आणणारे आहेत. कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी झालेल्या लढाईच्या कथेवर हा चित्रपट बेतलेला आहे.यामध्ये अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतलेली दिसते. तर अभिनेता सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे.दरम्यान, तानाजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका काजोल साकारत आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा :  http://bit.ly/2qhiYJT

error: Content is protected !!
Exit mobile version