..तर हैदराबाद बलात्कार प्रकरण घडले नसते

हैदराबाद: डॉक्टर महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला असून, प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

विना परवाना चालवत होता ट्रक

मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपी आरिफ एक ट्रक डायव्हर आहे. तो २६ वर्षांचा आहे. रिमांड रिपोर्टनुसार, आरिफला तेलंगाना रोड ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने २४ नोव्हेंबरला महबूब नगर परिसरात वाहन चेकिंहवेळी ताब्यात घेतलं होतं. आरिफकडे गाडी चालवण्याचे कोणतेही परवाने नव्हते. त्यानंतर हाच ट्रक महिला डॉक्टरचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आला.

२ दिवस आधी पोलिसांच्या तावडीतून पळाला मुख्य आरोपी

आरिफकडे गाडी चालवण्याचे कोणतेही परवाने नव्हते. आरिफ मागच्या दोन वर्षांपासून विना परवाना ट्रक चालवत होता. सगळ्यात खळबळजनक म्हणजे बलात्काराची ही घटना घडण्याच्या २ दिवस आधी मोहम्मद आरिफला पोलिसांनी चेकिंग वेळी ताब्यात घेतलं होतं. घटनेच्या दोन दिवस आधी आरिफच्या ट्रकमध्ये विटा भरल्या होत्या. हा ट्रक RTOच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि हैदराबादच्या मधे महबूबनगर परिसरात पकडला. पण त्यानंतर ट्रकला सोडून देण्यात आलं. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. जर हा ट्रक सोडलाच नसता आणि आरिफवर कारवाई केली असती तर बलात्काराची ही मन हेलावणारी घटना घडली नसती असं पोलिसांनी म्हटलं आहे.

आरिफने ट्रकच्या इंजिनमधून तारा काढल्या

हा ट्रक RTOच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक आणि हैदराबादच्या मधे महबूबनगर परिसरात पकडला. पण त्यानंतर ट्रकला सोडून देण्यात आलं. ट्रक पकडला तेव्हा आरिफ ने आपल्या मालकाला फोन लावला होता. मालकाच्या सांगण्यावरून त्याने इंजिनच्या तारा काढून टाकल्या. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, ट्रकमध्ये खराबी आहे. त्यामुळे ट्रक घेऊन जाणं अधिकाऱ्यांना शक्य झालं नाही म्हणून त्यांनी आरिफला जाऊन दिलं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा