…तर तुमचं पॅन कार्ड ठरेल बेकायदेशीर

नवी दिल्ली : फायनान्स बिलनुसार, डेडलाइन संपल्यानंतर आधार कार्डला लिंक न केलेलं पॅन कार्ड वापरण्यायोग्य राहणार नाही. त्यामुळेच हे टाळायचं असेल तर लवकरात लवकर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचं काम लवकरात लवकर करा. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस या विभाागतर्फे तुमचं पॅन कार्ड अवैध ठरवण्यात येईल. असं असेल तर त्या व्यक्तीने पॅनकार्डसाठी अर्जच केलेला नाही, असंच गृहित ठरलं जाईल, असं इनकम टॅक्स विभागाने म्हटलं आहे.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीची डेडलाइन वाढवून आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतची मुदत दिली आहे. हे काम आता ऑनलाइन किंवा SMS च्या माध्यमातूनही करता येईल. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची ही सातवी संधी आहे.
आत्ताच्या नियमांननुसार, तुम्ही पॅनकार्डच्या जागी आधार कार्डचा नंबर देऊ शकता. पण त्यासाठी दोन्ही कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. इनकम टॅक्सच्या ई फायलिंग पोर्टलवर लिंक आधार नावाचा एक सेक्शन आहे. इथे तुम्हाला तुमचा पॅन आणि आधार नंबर टाकायचा आहे. यानंतर OTP येईल. त्याच्या मदतीने तुम्ही हे काम करू शकता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा