….तर विरोधात बसा: अमित शहा यांचे राज्यातील नेत्यांना आदेश

31

टीम न्युज अनकट : नुकतेच विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. परंतु राज्यात अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही. त्यानंतर राज्यपालांनीच भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्या भाजप-शिवसेना महायुतीतला ‘फिफ्टी-फिफ्टी’ चा घोळ मात्र अद्याप संपत नाहीये. त्यामुळे हा तिढा वाढत जाऊन ‘आमचं बिघडत चाललंय’ अशी स्थिती सद्या निर्माण झाली आहे.

सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले आहे.

या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर भाजपने आपल्या कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. राज्यपालांनी दिलेल्या आमंत्रणाबाबत आमची भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहोत. त्यापूर्वी आज सायंकाळी चार वाजता पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
या बैठकीत पुन्हा एकदा चर्चा करून भाजपची भूमिका राज्यपाल आणि जनतेसमोर मांडणार असल्याचे मुंगनटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र या बैठकीनंतर गृहमंत्री अमित यांनी शिवसेना जर सत्ता स्थापन करणार असेल तर विरोधात बसा असे आदेश राज्यातील नेत्यांना दिले आहेत.