मुंबई, २५ जून २०२० : तारक मेहता का उलटा चष्माचा सोढी उर्फ गुरुचरण सिंग यांनी हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. आहे. तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका निःसंशयपणे सर्वात आवडती व इतरांच्या तुलनेत बराच TRP घेणारी मालिका आहे. आहे.
या मालिकेत दिलीप जोशी यांच्या जेठालाल पात्राबरोबरील भुमिकेबरोबरच गुरुचरण सिंग यांचे सोढी हे पात्र देखील अत्यंत प्रसिद्ध पात्र आहे. त्याची मजेदार बाजू कोण विसरेल? त्याच्यातील एनर्जी, प्रत्येक वेळेस उफाळून येणारा त्याचा स्वभाव पुढचा मागचा विचार न करता कोणत्याही परिस्थितीला धडकण्याचा त्याचा विश्वास हे सगळेच लक्षात राहण्यासारखे असल्याने प्रेक्षकांना हे पात्र खुपच भावते. परंतू आता अशी चर्चा चालू आहे की या अभिनेत्याने वैयक्तिक कारणास्तव हा कार्यक्रम सोडण्याचे ठरविले आहे. गुरुचरणने यापूर्वी काही कारणास्तव हा शो सोडला होता, परंतु त्या नंतर तो परत आणला गेला.
दरम्यान, यापूर्वीही अशी बातमी आली होती की दिशा वकानी उर्फ दयाबेन ही या कार्यक्रमात एका विशेष भागासाठी परत येणार असून या मालिकेचे ३००० भाग पूर्ण केल्यामुळे या कार्यक्रमासाठी एका विशेष भागासाठी ती परत येणार आहे.
शो चे निर्माते असित मोदी यांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की गुरचरण शो सोडणार असल्याची कुठलीही माहिती माझ्यापर्यंत पोहचली नसून या केवळ अफवा आहेत सध्या मालिकेचे शूटिंग पुन्हा सुरू करण्याची प्राथमिकता आहे आणि त्यानंतरच काही तपशील असतील तर नंतर ते पुढे आणले जातील. या शोने १२ वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केली आहेत आणि हा सर्वात दीर्घकाळ चालणार्या कार्यक्रमांपैकी एक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी