माढा, ४ नोव्हेंबर २०२०: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. युनिट नं. 2 करकंब या कारखान्याचा 2020-21 चा दुसरा गाळप हंगाम सुरू झालेला असून या गळीत हंगामात उत्पादीत पहील्या साखर पोत्याचे पुजन विद्यमान जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सुरूवातीस कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने युनिट नं. २ करकंब येथे ऊस गाळप हंगाम 2020-21 मध्ये 5 लाख मे. टन गाळप करणेचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे 6 हजार 360 हेक्टर क्षेत्राची नोंद असून अंदाजे 6 लाख 50 हजार मे. टन ऊस गळीतास उपलब्ध होईल. कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमतेएवढा उसाचा पुरवठा होण्यासाठी 300 ट्रक्स/ट्रॅक्टर्स, 200 बैलगाडी व 150 ट्रॅक्टर टायरगाडीचे करार करण्यात आलेले असून सर्व यंत्रणा कामावर हजर झालेली असून गळीत हंगाम जोमाने सुरू झाला असल्याची माहीती जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली.
सदर प्रसंगी जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे, कार्यकारी संचालक आर. एस. रणवरे, युनिट नं. 2 चे जनरल मॅनेजर एस. आर. यादव, चिफ केमिस्ट पी. एस. येलपले, चिफ इंजिनिअर एन. एच. नायकुडे, इनचार्ज चिफ केमिस्ट बी. जे. साळुंखे, फायनान्स मँनेजर डी. डी. लव्हटे, शेतकी अधिकारी एस. एस. बंडगर, टाईम ऑफिसचे टी. ए. लोंढे व इतर मान्यवर उपस्थित होते
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील